II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:49:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-10
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

माझा राजा...माझा अभिमान
शिवछत्रपती स्वाभिमान... तुजमुळे
कृतार्थ जाहले हिंदवी स्वराज्य..,
कारण तुज होती 'भवानी माता' पूज्य...
वरदान तुज तिचे लाभले.., समशेरीत असे
तेज सामावले... खेळतो रणसंग्राम
मावळ्याची ती स्वामिनिष्ठ साथ अन
सोबत...गनिमी कावा.., आई
जिजाऊचा तो छावा... पावित्र्य राखिले
प्रत्येक धर्माचे.., प्रतिक
भगवा असले तरी तत्व मात्र ऐक्याचे...
तुझ्या किर्तीसम कोण न साजे.., सूर्य
हि तुझ्या प्रखरतेस लाजे... तुज
माथ्यावरील चंद्रकोर ग्वाहि देई..,
हिंदवी स्वराज्य हे कले_कलेने वाढत
जाई... मुद्रेवर शब्द कोरिले खास..,
लोककल्याणाचा तुज होता ध्यास...
किती वर्णू
तुज...वर्णाया शब्दची जाहले अबोल..,
ज्या 'मातीत' सांडिले रक्त तुझे अन
मावळ्याचे फक्त कपाळी लावून
नाही कळणार तिचे आम्हास मोल...
त्यागाची नी राष्ट्रप्रेमाची प्रचीती अशी न
यावी आम्हा.., या मराठी भूमीत
जन्मावा तू ...पुन्हा पुन्हा...
चहूकडे पाहता महाराष्ट्रदेशा ..,
दिसेल तुम्हास शिवाजी राजा...
गर्जा महाराष्ट्र माझा ...
शिवछत्रपती माझा...""

=========================================

उत्तर विएतनामच २० वर्षा पासनं
जगातल्या सगळ्यात
ताकदवर देश म्हणजे अमेरिका सोबत
युद्ध चालु होतं
१९५५ ते १९७५. पण शेवटी २०
... वर्षाच्या युद्धा नंतर
उत्तरी विएतनाम ने
अमेरिका चा पराभव
केला आणी उत्तर आणी दक्षिण
विएतनाम ला एकत्र केलं.
विएतनाम ची संरक्षण मंत्री 'मादाम
बिन्ह' भारतात
१९७७ मध्ये आली तेव्हा भारताचे
संरक्षण
मंत्री जगजीवन राम यांने
तिचा स्वागत केला.
आता जेव्हा पण असे विदेशी पाहुने
भारतात येतात
तेव्हा भारत सरकार त्यांना 'राज
घाट' 'शांती वन'
'कुतुब मिनार' 'ताज महाल' वगेरे
दाखवतात. पण
त्या मादाम बिन्ह ने एक वेगळीच
मागणी टाकली.
ती म्हटली की हे सगळं नंतर बघेल.
सर्वात पहिले
मला रायगडावर जाऊन
शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार
घालुन त्यांच्या पायांना स्पर्ष
करायचा आहे.
मग नंतर तिला जेव्हा विचारलं
की तुम्हाला महाराजां बद्दल
इतका आदर का?
तेव्हा तिने उत्तर दिलं,
''जेव्हा अमेरिका सोबत आमचं
(विएतनामच) युद्ध सुरू होतं
तेव्हा आमच्या सौन्यात 'Vietcong'
मध्ये आमचे सैनिक
शिवाजी महाराज
आणी त्यांच्या मवळ्यांच्या शौर्य
गाथा सांगायचे. त्यांनी प्रचंड
मोठ्या मुगलांच्या सैन्याला कसं
पराभूत केलं हे ऐकुन
आमच्या सैन्याचं मनोबल
आणखी वाढलं.
आणी आपल्या देशा साठी काही केल
पाहिजे हे
त्यांना कळालं.
सगळी युवा पिढी सैन्यात सामील
झाली आणी मरे पर्यंत लढली. एकच
आदर्श त्यांच्या समोर
होता. तो म्हणजे फक्त
शिवाजी महाराज.
त्यांना बाजी प्रभूंची शौर्य
गाथा सांगितली.
त्यांना शाहिस्तेखाना बद्दल
सांगितलं. अचुक नियोजन
आणी 'गनिमी कावा' वापरल्या मुळे
आम्ही अमेरिकाला पराभूत करू
शकलो.
गनिमी काव्याचे जनक
सुद्धा शिवाजी महाराज आहेत.
महाराजांच्या गनिमी कावा मुळेच
आमचा विजय झाला. आणी Cuba चे शे
गुवेरा आणी फिडेल
कासत्रो यांचा सुद्ध
पराभव आम्ही करु शकलो. म्हणुन
मला अभिमान
वाटतो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणी मा नशीबवान
आहे की रायगड बघु शकले.'' ||
जय जय शिवराया ||

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.