II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-15

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:00:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-15
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

शिवकाळी लढणार्या मावळ्यांची झुंज
बघुन यमही गुंग होऊनी क्षणभर
विसावा घेई नसता ढाल
केलेली हाताची ढाल अन
शिरविना बाजीप्रभुंची झुंज
पाहूनी देवही दंग होई
पाहता ती स्वामीनिष्ठा सारे जग
थक्क
झाले इतिहास मावळ्यांनी गाजवला
स्वराज्य उभे राहिले राजे
शिवछत्रपती झाले
शंभुरायांनी ते टिकवले
म्हणुनच आज मान ताठ आहे
गर्व बाळगा महाराष्ट्रीयन असल्याचा
कारण या राज्याचा सोनेरी इतिहास आहे
हिर्याची पारख सगळ्यांनाच
करता आली असती तर सगळेच
जोहरी झाले असते
पण तसे कधी होत नाही जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र
=========================================

काळजाने वाघ...
डोळ्यात आग...
छातित फौलाद...
हि मराठ्याची औलाद...
ताकद हत्तीची...
चपळाई चीत्त्याची...
भगवे रक्त...
शरीराने सक्त...
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त...
अन झुकवु शकतात फक्त मराठेच...
हर हर महादेव....
=========================================

पेटलं तेच रक्त ......... शिवबाचं!!
धडधडणाःया छातीचंअनं........!!
मराठ्यांच्या जातीचं ........!!
धारधार पातीचं अनं.........!!
स्वराज्याच्या मातीचं.........!!
कितीही आल्या दिल्लीहुन स्वा-
य .........!!
तरी मनगटातं बळ आहे वाघाचं
अरे ''मराठा आहे मराठा "
म्हणावं .........!!
मोडंल पण वाकणार नाही, हे रक्त
मराठ्याचं.........!
=========================================

अभिमानच नाही तर माज आहे माज
मराठी असल्याचा...
थांबा.इथंच चुकतोय आपण
मित्रांनो..माज? ?
अरे भाऊ कसला माज??
स्वत:च्या मातृभाषेचा,संस्
कृतीचा अभिमान
असतो.असावाच लागतो नाहीतर
तर
तो भुमिपुत्र कसला??
पण या अभिमानाला जर आपण माज
म्हणु
लागलो तर आपणच
आपल्यातला उध्दट
मराठी माणसाचे प्रदर्शन करतोय
असं
नाही का वाटत??
आक्रमकता दाखवण्यासाठी
"माज" हा शब्दप्रयोग
मला तरी अयोग्यच
वाटतो.कारण मराठी माणसाचे
रौद्ररुप आजवर
सगळ्यांनी पाहिलेच आहे मग दोन
अक्षरांची ती काय गरज??
अभिमान असावा,स्वाभिमान
असावा पण माज
नको कारण याच मराठी मातीत
जन्माला आलेला आपला सचिन
तेंडुलकर
यशाच्या सर्वोच्च शिखरावर
असुनदेखील
त्याची नम्रता तसुभरही ढळलेली नाही,
तर मग
माझा आवडता खेळाडु सचिन तेंडुलकर
असं गर्वाने
सांगणारे आपण त्याच्याकडुनकाय
शिकलो??
म्हणुन परत एकदा सर्वांना नम्र
विनंती की कोणीही माज आहे असं
म्हणु नये पण
समोरच्याला लाजवेल
ईतका अभिमान मात्र
हवाच..
जय शिवराय../>
जय महाराष्ट्र../>
जय श्रीराम.../>

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              ----------------------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.