II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-19

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:08:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-19
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मी राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे
करण्याची..
औरंग्या तुझी औकात
नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखापाहुन
भगव्यारक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहेतोच
आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात
आमच्याआग आहे..
लांडग्याची जात तुझी
मी सह्यांद्रिचा वाघ आहे...
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥ —
=========================================

मराठ्यांचा वाघ शोभतो
शिवबाचा मावळा..!! रणशिंगफुंकले
स्वातंञ्याचे
तलवार मुठी आवळा,
स्वराज्य रक्षणा उभा ठाकतो
शिवबाचा मावळा..!!गुलामी तुनी मुक्त
व्हावया
करीती गडकिल्ले कळवळा,
स्वराज्य तोरण चढविण्याधावतो
शिवबाचा मावळा..!! रणभुमीवरआग
फेकितो
जणु तोफेचा गोळा,
धडकीभरवितो मृत्युलाही
शिवबाचा मावळा..!! "हर हरमहादेव"
रणी गर्जणा
रक्त करी सळसळा,
मराठ्यांचा वाघ शोभतो
शिवबाचा मावळा..!! मराठीमातीत जंन्म
घेतला
अभिमान उरी आगळा,
शिवचरणांवर निष्ठा अर्पितो
शिवबाचा मावळा..!!
शिवबाचा मावळा..!! देवाकडे एकच मागणे
मागेन ते
म्हणजे मराठीच्या अस्मितेसाठी,
हिंदुंच्या रक्षणासाठी सतत झगडणारे
हिंदुमानावर
कोरलेले एकमेव
मराठी नाव, आपल्या संस्कृतीची जान
करून
देणारे, देशाबदल प्रेम शिकवणारे....
शिवसेना प्रमुख माननीय
श्री बाळासाहेब ठाकरे
यांना आई जगदंबे उदंड आयुष्य
देवो..हीच
प्रथांना .....
=========================================

असे नका समजू
विझलेली हि आग आहे...
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे...
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे !!
शिवरायांचे मावळे आजही वाघ आहे !!
जय भवानी.....!!
जय शिवराय.....!!
हर हर महादेव.....!!

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.