II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-20

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:10:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                   चारोळी, कविता क्रमांक-20
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मी राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच
मराठ्याच्या जातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे
करण्याची..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात
आमच्या आग आहे..
लांडग्याची जात तुझी
मी सह्यांद्रिचा वाघ आहे...
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥

=========================================

विशाल सागरालाही पायबंध
घातला त्यानं बांधुन सिंधुदुर्गे .
नजर
त्याची गरुडापरी पडली सिद्दीच्या जंजिरावरी ,
केली त्यानं
नऊवेळास्वारी तरीहीपडलं
अपयश पदरी , असेल का दुःख
या परी म्हणुन
थांबला नाही तो झुकला नाही तोपेटुन
उठला तो मर्द मराठा भिडला तो थेट
मुघलांना , दिलं त्यानं आव्हान डच,
पोर्तुगिजांना घेतलं अंगावर त्यानं
ब्रिटिशांना ,
शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून
उराला सगळ्यांना....
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!
=========================================

छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने
हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात
बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ
शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन
बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात्
भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक
पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.