II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-21

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:12:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-21
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

एकच देव माझा...
ईतिहासाचा बाप
श्री छत्रपति शिवाजी राजा....
एकच दैवत माझे ...
कर्तृत्वान महाराज शहाजी राजे....
एकच माझी माता....
संस्काराचा सागर आउसाहेब जिजाऊ
राजमाता....
एकच आदर्श माझा.....
पराक्रमाच आभाळ शंभुराजा माझा....
एकच माझे निशान....
गनिम थरथर कापे पाहुन
त्या भगव्याचा अभिमान.....
एकच माझे राज्य.....
लाखो मावळ्यांच्या बलीदानान उभ
राहिलेल
स्वराज्य.....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
=========================================

बिना तलवारीचा मराठा म्हणजे
सेनापती विना सैन्य,
समशेरीला खबर नसते जाती अन
पातीची.....
तिला फक्त तहान असते
गानिमच्या रक्ताची.....
लखलखत्या समशेरीला धाक
नसतो गदारांचा.....
तिला फक्त वेध
असतो त्यांच्या गर्दीनीचा.....
=========================================

आमच्याच वाटेवर येऊन आमचीच
वाटमारी करणार्याँची त्याच्याच
वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय
आमच्या वाटेवर परतत नाहि मराठ
=========================================

एकची तो राजा शिवराय जाहला.
नगार्यांच्या नादात
शिवनेरी आनंदला आई
जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास
आला.
पराक्रमाचा बादशाह
महाराष्ट्री अवतरला.
एकची तो राजा शिवराय
जाहला.
हजारो मावळे उभे
ठाकले,
दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने
दुमदुमल्या दाही दिशा तोफांसमोरी तलवार
घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवराय
जाहला..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराज
=========================================

मरणाला कोण भीतो.....
आम्ही वार शत्रुचे निधड्या
छाताडावर घेतो.....
आहेत उभे आजही आमच्या
पराक्रमाचे पहाड.....
गाडले याच मतीत
स्वराज्याच्या आकाशात भिर भिरनारे
गीधाड.....
जन्मतात शुर ईथेच ईथेच रुळते
ईतिहासाची नांदी.....
नुसत्या हुंकाराने केली
शत्रुला ईथे येन्याची बंदी.....
उलगडले कुठे
जगाला शिवबाच्या शौर्याचे कोडे.....
वाचुन ईतिहास आमचा सैतानाचही
काळिज टाहो फोडे.....
लांडगे काय धाक दाखवतील या
मराठ्याला.....
पराक्रम माहीत
नाही का आमचा त्यांच्या बापाला.....!!
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              ----------------------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.