IIश्री गणेशाय नमःII-"श्री गणेश संकष्टी चतुर्थी"

Started by Atul Kaviraje, February 20, 2022, 02:07:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       IIश्री गणेशाय नमःII
                                     "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                    -----------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-२०.०२.२०२२-रविवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

     संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय पाहून उपवास सोडला जातो. गणरायाची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून संकष्टी साजरी करण्यात येते. संकष्टीच्या शुभेच्छा या दिवशी दिल्या जातात. काही जणांना संकष्टी आहे हे कधी कधी लक्षात राहात नाही अशावेळीही अगदी आदल्या दिवशीपासून वेगवेगळ्या शुभेच्छांच्या इमेज व्हायरल होताना दिसतात. अशाच काही शुभेच्छा.

1. भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

2. पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
– संकष्टी चतुर्थी बनवा खास

3. श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

4. मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

5. आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना
– संकष्टीच्या शुभेच्छा!

6. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
– गणपती बाप्पा मोरया!
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

7. वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
– संकष्टी चतुर्थी बनवा खास

8. ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे
– संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
– संकष्टीच्या शुभेच्छा!


--दीपाली नाफडे
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.02.2022-रविवार.