चारोळ्या-"महागाईचा भस्मासुर भस्म करीत चाललाय,जनतेचा आक्रोश गगनाला भिडलाय !"

Started by Atul Kaviraje, February 22, 2022, 01:45:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

          विषय : सिंधुदुर्ग  येथे  महागाई -विरुद्ध  जन -जागृती  आंदोलन
                   वास्तव -महागाई -विरुद्ध  आंदोलन  चारोळ्या
   "महागाईचा भस्मासुर भस्म करीत चाललाय,जनतेचा आक्रोश गगनाला भिडलाय !"
  -----------------------------------------------------------------------


(1)
काय  कारणे  आहेत  हो  या  "महागाई"  वाढीस  ?
सर्वच  बाजूनी  जनता  झालीय  त्रस्त , झालीय  कासावीस
"महागाईचा"  भस्मासुर  त्यांचे  करतोय  ग्रासा -ग्रासाने  भस्म ,
वाढतंच  जाणार , जनतेने  आताशी  सोडलीय  करायची  घासाघीस .

(2)
सिंधुदुर्ग  जनता  उतरलीय  रस्त्यावर , "महागाई" -विरुद्ध  नारे  देत
जन -जागर  आंदोलन , हिरीरीने , मोठ्या  हिकमतीने  लोक  करताहेत
पण  येणार  का  यश , होईल  का  ही  "महागाई"  कमी  ?
वाढतंच  जाणार  "महागाई" , त्यांची  एकीचं  पडेल  शेवटी  कमी  !

(3)
काही  नाही  बिघडणार  सरकारचे , या  "महागाई" -विरोधी  आंदोलनामुळे
जन -जागृती  आधीही  होत  होती , आजही  होतेय , उद्याही  होईल
आक्रोश  त्यांचा  पोचत  नाही  का  सरकारच्या  कानी  ?
ठोस  पावले  उचलली  तर , सरकारचे  का  खूप  काही  जाईल  ?

(4)
या  नारेबाजीला , या  आंदोलनाला , काहीही  फळ  येणार  नाही
जैसे  थे  तैसेच  परिस्थिती  सदैव  कायम  रहाणार  आहे
"महागाईच्या"  लोखंडी  बेड्यांत  जखडून  ही  बिचारी  गरीब  जनता ,
अंती  खितपत  पडून , शेवटच्याच  घटका  मोजणार  आहे  !

(5)
हे  जन -जागृती  आंदोलन  शेवटी  दोलायमान  ठरणार  आहे
जनतेच्या  आंदोलनाचा  सारा  उत्साह  शेवटी  थंडावणार  आहे
जनता  आधीच  आहे  जागी , तिला  कसली  जाग  आणता  ?
या  "महागाईचा"  विळखा  अजून  होईल  मजबूत , पाहता -पाहता  !
     सुटका  नाही , शेवटही  नाही , या  प्रश्नाला  उत्तरच  नाही
     ही  वाढती  "महागाई"  कधीही  कमी  होण्याचा  प्रश्नच  उद्भवत  नाही .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.02.2022-मंगळवार.