लशीकरण चारोळ्या-"दुर्गमभागात गावोगावी लसपोचतेय,त्याचे सारेश्रेय या ड्रोनलाजातेय"

Started by Atul Kaviraje, February 23, 2022, 01:39:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय  : जव्हार , पालघर  येथे  दुर्गम  भागांत , दुर्गम  गावांत , ड्रोन -द्वारे  लशींचा  पुरवठा  सुरु .
   कोरोना लशीकरण -ड्रोन -द्वारे  लस -पुरवठा  अनोखी  अभिनव  योजना -चारोळ्या
        "दुर्गम भागात गावोगावी लस पोचतेय,त्याचे सारे श्रेय या ड्रोनला जातेय"           --------------------------------------------------------------------------


(1)
कोरोनाचे  कळत  नाही ,कधी  संपेल  माहित  नाही ,दररोज  नवा  प्रकार  येतच  राही
"लस" घेणे,"लशीकरण"  होणे ,प्रतिकार -शक्ती  वाढणे ,याशिवाय  दुजा  पर्यायच  नाही
शहरातील लोकांचे ठीक आहे,"लस"-पुरवठा होतोय ,सहजगत्या "लस" उपलब्ध होतेय ,
पण गावागावाच्या"दुर्गम"भागांचे काय? जेथे डांबरी रस्ताच सोडा,पायवाटही  नीट  नाही .

(2)
मोदींचा  १३५  कोटी  जनतेचा  "लशीकरण"  संकल्प , पूर्ण  व्हावयास  हवा
यासाठी जनतेने"लशींच्या"दोन्ही डोसचा,प्राथमिकतेने,युद्ध-पातळीवर लाभ मिळावयास  हवा
पण या"दुर्गम"भागांतील ग्रामस्थांचे काय? ते या"लशीकरणास"  अजुनी  आहेत  वंचित ,
इतरही अनेक सुविधा नाहीत  या  भागात , निर्जनचं ,निर्गमचं जणू,  आहेत  ते  व्यथित .

(3)
अंती त्यांचे तप  फळाला  आलेय ,सरकारला  त्यांची  व्यथा , त्यांचे  मागणे  ऐकू  आलेय
डॉक्टर -नर्सच्या  ताफ्यासह ,"लशींच्या"  मुबलक  पुरवठ्याचे  "ड्रोनने"  वहन  केलंय
हे आधुनिक छोटेखानी,विमान-हेलिकॉप्टर-सदृश्य रिमोट-कंट्रोल  यंत्र  वरदानच  ठरलेय ,
गगन विहरीत,अस्तित्त्वाचा छडा लावीत,"ड्रोनने"हे"लशींचे"भांडार ग्रामस्थांच्या घरोघरी  पोचवलेय .

(4)
या  आधुनिक  तंत्रज्ञानास  माझा  सलाम , ज्याने  हे  "ड्रोन"  निर्मिले ,संशोधन  केले
असाही  उपयोग  होतोय  या  गॅजेटचा ,यापेक्षा  दुसरे  काय  ते  भले ,चांगले  ?
आज हा"ड्रोन"या दुर्गम भागांतील ग्रामस्थांचे प्राण वाचवतोय,"लशींचा" पुरवठा  करतोय ,
जेथे  मनुष्यही  जाणे  दुष्कर ,अशा  भागांत  तो  सहजच , सुलभतेने  पोचतोय .

(5)
जव्हार ,पालघर  ग्रामीण  "दुर्गम"  भागांत ,हा  "ड्रोन"  सध्या  आहे  कार्यरत
सेवा देतोय , सुविधा  पुरवतोय ,या  वंचित  गावकऱ्यांना  मदत  करतोय , सतत ,अविरत
इतरही अनेक "दुर्गम"  भागांत , या  अभिनव  संकल्पनेचा  सरकारने  अवलंब  करावा ,
वेळेचे महत्त्व जाणून,तात्काळ  उपाय-योजना  होऊन , त्वरित  "ड्रोनचा"  वापर  व्हावा .

(6)
या गरीब ग्रामस्थांचा  "लशींचा"  प्रश्न  सुटत  आहे , पण  त्यांच्या  इतर  सोयीचे  काय  ?
त्यांच्या  कुपोषित ,अशिक्षित ,सर्व  सोयींना  वंचित  असलेल्या  मुलांचे  भविष्य  काय  ?
भारताच्या नकाशात, त्या भागांचे ,गावांचे नावच नाही दिसत, त्यांच्या अस्तित्त्वाचे  काय  ?
सर्वतोपरी विचार व्हावा याचा,तेही यावेत  उजेडात ,खितपत  आहेत , आहेत  असहाय्य .

(7)
या  "ड्रोनने"  या  ग्रामस्थांचे  प्राण  वाचवलेत ,वेळीच  "लस" -पुरवठा  करून
कोरोनाचा  विस्तार  होतोय  कसाही  अन  कुठेही ,हे  चालणार  नाही  विसरून
आता  त्वरा  करावी  सरकारने ,त्यांचे  हीत  पाहावे ,त्वरित  कार्यक्षम  व्हावे ,
प्रसंगच  आहे  आणीबाणीचा ,एकाच  लक्ष्य  असावे ,लक्ष  ठेवावे ,सक्षम  व्हावे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2022-बुधवार.