"२३-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 23, 2022, 11:53:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०२.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "२३-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                   ------------------------


अ) २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.

१७३९: चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.

१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.

१९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.

१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.

१९९६  कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

=========================================

ब) २३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१६३३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १७०३)

१८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )

१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)

१९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)

१९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)

१९६५: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.

१९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)

=========================================

क) २३ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १७७७)

१७९२: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)

१९०४: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)

१९४४: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)

१९६९: चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ – नवी दिल्ली)

१९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९६०)

२०००: वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.

२००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१८)

२००४: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९३४)

२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९२३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2022-बुधवार.