चारोळ्या-"बाळ गेलंय चोरीला महिला टोळींकडून,सूत्रे हलताहेत चोरीची सारी मुंबईतून"

Started by Atul Kaviraje, February 25, 2022, 01:49:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

          विषय : मुंबईत  लहान  बाळे  चोरणारी  महिला  टोळी  सक्रिय .
                       वास्तव -लहान  बाळे  चोरी  चारोळ्या
    "बाळ गेलंय चोरीला महिला टोळींकडून,सूत्रे हलताहेत चोरीची सारी मुंबईतून"
   -------------------------------------------------------------------


(1)
लहान  "मूल"  म्हणजे  देवाघरचे  फूल , आई  देते  त्याला  मायेची  झूल
घरातच रेकी होतेय  "बाळांवर" , आई -वडिलांना  केलं  जातंय  फूल, त्यांना देऊन भूल
या  "बाळ" -चोर  महिलांचा , एकचं  अन  एकचं  असतो चोरीचाच  उसूल ,
घरी  कोणी  नाही  हे  पाहून , करत्यात  त्या  "बाळालाच'  गूल .

(2)
हे  आजचं  नाही  घडत , यापूर्वीही  हे  चित्र  होतं  दिसत
पूर्वीही  होत  होत्या  "मुलांच्या"  चोऱ्या , दहशत  माजली  होती  मुंबईत
आता  तेच  दिवस  परत  आलेत , लहान  "मुलांवरच"  आहे  यांचा  डोळा ,
बोलता  येत  नाही , रडता  येत  नाही , कधीच  नाहीत  काढत  ते  गळा .

(3)
ईझी  मनी  हवाय , घरांघरांवर  असते  यांची  पाळत
CCTV लाही  लाजवील  अश्या , या  टोळ्या  असतात  कार्यरत
मोका  पाहायचा ,डाव  साधायचा , "बाळाचा"  झोपाळाच  सरळ  उचलून  न्यायचा ,
खुळखुळा  दाखवून ,वाजवून  "बाळाचा"  मस्तपैकी  डोळा  लागायचा .

(4)
पूर्वी  अपहरण  व्हायचे  रस्त्यारस्त्यांतून , आता  हे  लोण  पसरलाय  घराघरांतून
इतके  कसे  हे  बेफिकीर  आई -वडील  "बाळाचे" , मशगूल  आपल्याच  कामात
हॉस्पिटलमध्ये  अजुनी  होतेय  नवजात  "अर्भकांची"  अदला -बदल , नजरचुकीने ,
पण  इथे  तर  चक्क  अपहरणंच  होतंय  "बाळाचे" , घुसून  घरात .

(5)
गुन्हेगाराने  आपला  मोर्चा  आता  लहान  "बाळांकडे"  वळवलाय   
त्यांची  कमकुवत  मानसिकताच , यातून  स्पष्ट  दिसून  राहिलीय
मागेल  ती  किंमत  द्यायला  आई -वडील  असतात  तयार , सुटकेसाठी ,
मागणी नाही पूर्ण झाली तर,हे विकती "बाळांना", निपुत्रिकांस कोणत्याही  किमतीसाठी .

(6)
हे  नीच  कृत्य  कसं  करवतय , यांचे  हात  नाहीत  का  कापत  ?
दये -मायेचा  पाझरच  काय , हे  करताना  त्यांचे  कठोर  हृदय  नाही  ओलावत  ?
बस  पैसाच  हवा , यासाठी  ते  कोणत्याही  थराला  जातील , कृष्ण -कृत्य  करतील ,
या  निंद्य कृत्यातून, या निष्कपट "बाळांचे" भविष्य ,भावी आयुष्य अंधारातच  ठेवतील  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.02.2022-शुक्रवार.