"चिमुकली मुले पुन्हा परतलीत शाळांत,स्वागत होई ढोल-ताशांच्या उत्स्फूर्त गजरात"

Started by Atul Kaviraje, February 28, 2022, 01:47:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : जळगाव  येथे  पहिले  ते  चौथीपर्यंत  शाळा  सुरु  झाल्यात . मुलांचे ,चिमुरड्यांचे  स्वागत  ढोल - ताश्यांच्या  गजरात  झाले .
             वास्तव -कोरोना  काळातही  सुरु  झालेल्या  शाळा - चारोळ्या
  "चिमुकली मुले पुन्हा परतलीत शाळांत,स्वागत होई ढोल-ताशांच्या उत्स्फूर्त गजरात"
-------------------------------------------------------------------------


(1)
कोरोनाचा कहर  आहे  सुरूच , गेली  दोन  वर्षे सतत
"शाळा" , वाट  पाहतेय  "चिमुकल्यांची , मुला -मुलींची" , तिलाही  टाळे  लागलेय
पटांगण ,वर्ग ,फळा ,बाके  वाट  पाहताहेत  "मुलांची , विद्यार्थ्यांची" ,
कोळिष्टकं  जमलीत  त्यांचेवर , मातीचे ,धुळीचे  अनंत  पुट चढलेय .

(2)
शुभ -वार्ता  कळलीय , लवकरच  सुरु  होणार  "शाळा"  कोरोना  काळातही
आनंदली सारी  "चिमुरडी  मुले -मुली"  अन  त्यांच्या  वह्या -पुस्तकेही
पुन्हा  एकदा  त्यांचा  बाल -स्वर  घुमणार , त्यांचा  ओरडा  ऐकू  येणार ,
कान  टवकारून  त्यांना  ऐकण्या ,पहाण्या,  "शाळा"  पुन्हा  एकदा  तयार  होणार .

(3)
आज  तो  सुदिन  आलाय , "शाळेत  चिमुरड्यांचा"  पुन्हा  प्रवेश  झालाय
स्वागता  त्यांच्या  "ढोल -ताशा"  गरजू  लागलाय , आवाज  निनादू  लागलाय
बाल -मुख  पाहण्यास ,त्यांना  अनुभवण्यास , उत्सुक  कित्येक  दिवस ,
आज  "शाळेचा"  आनंद  गगनात  मावेनासा  झालाय , तिचा  जणू  प्राणच  परतलाय  .

(4)
मैदान  गाजविणाऱ्या एखाद्या  वीर -शूरांप्रमाणे  "मुला -मुलींचे'  स्वागत  होतंय
"ढोल -ताशांच्या"  गजरात , "चिमुरड्यांच्या"  स्वागतार्ह  गीत  गायलं  जातंय
उद्याचे  भविष्य , या  "मुलांत" , एक  सुजाण  नागरिक  पाहणारी  ती  "शाळाही" ,
त्यांना  पुन्हा  एकवार  घडविण्याचे  स्वप्न  उराशी  बाळगून  राहतेय .

(5)
आज  या  "चिमुरड्याना"  पुन्हा  "शाळा"  दिसलीय , आपले  मित्र -मैत्रीण  मिळालेत
याच  उत्साहात  ती  आपापल्या  बाकांवर  बसून  धडे  गिरवू  लागलीत
या  "चिमुरडयांच्या"  उत्साहास , जिद्दीस  माझा  एकवार  सलाम ,
या  कोरोना -काळातही  ती , आपल्या  भावी  आयुष्याचा  मार्ग  आक्रमू  लागलीत .

(6)
पुन्हा  एकदा  जल्लोषपूर्ण  वातावरणात , "शाळा"  सुरु  झाल्यात
"ढोल -ताशांच्या"  आवाजात , "मुलांचाही"  किलबिलाट  मिसळू  लागलाय
कोणे  एके  काळी  शांत  असलेली , उदास  भकास  "शाळा" ,
आज"मुलांच्या"गजबजाटात,हसण्या-खिदळण्यात,आरड्या-ओरड्यात न्हाऊन निघालीय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2022-सोमवार.