II महाशिवरात्री II-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 01:36:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II महाशिवरात्री II
                                             लेख क्रमांक-1
                                        -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

     "शिवरात्री चतुर्दशी तिथी मंगळवार, १ मार्च रोजी पहाटे ३ वाजून १६ मिनिटे ते २ मार्च रोजी रात्री १ वाजेपर्यंत राहील. या दिवशी पाच ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ योगही तयार होत आहेत. शिवरात्रीला धनिष्ठा नक्षत्रात परिधी नावाचा योग तयार होत असून, या योगानंतर शतभिषा नक्षत्र सुरू होईल."

     माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. यावेळी ही शुभ तारीख मंगळवार, १ मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीला दुर्मिळ योगायोग होणार आहे. शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच २८ फेब्रुवारीला सोमवार असून या दिवशी सोम प्रदोष व्रत केले जात आहे. १ मार्चला महाशिवरात्री आणि २ मार्चला अमावस्यापर्यंत विशेष पूजाविधी असतील. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि भोलेनाथने अलिप्तपणाचा त्याग करून गृहस्थ जीवन स्वीकारले होते. या दिवशी व्रत ठेवल्याने सौभाग्य प्राप्त होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाचा संसर्ग थांबल्यानंतर भाविक मंदिर आणि श्रद्धास्थानी जाऊन पूजा करू शकतील. उत्सवासाठी विशेष कार्यक्रमांची तयारीही सुरू झाली आहे.

                        पाच ग्रहांचा संयोग---

     यावेळी महाशिवरात्रीला पाच ग्रहांचा संयोग आणि दोन महान शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. मंगळवारी मकर राशीत शुक्र, मंगळ, बुध, चंद्र, शनी यांच्या संयोगासोबतच केदार योगही तयार होईल, जो उपासनेसाठी खूप फायदेशीर आहे. २८ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारपासून प्रदोषापासून शिवपूजेचा योग सुरू होईल. यामुळे तीन दिवस पूजाविधी होणार आहे. १ मार्चला महाशिवरात्री आणि २ मार्चला अमावस्या असेल. या दिवशी भाविक विधीवत पूजा विधी करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतील.

                         शिवपूजेसाठी शुभ मुहूर्त---

     शिवरात्री चतुर्दशी तिथी मंगळवार, १ मार्च रोजी पहाटे ३ वाजून १६ मिनिटे ते २ मार्च रोजी रात्री १ वाजेपर्यंत राहील. या दिवशी पाच ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ योगही तयार होत आहेत. शिवरात्रीला धनिष्ठा नक्षत्रात परिधी नावाचा योग तयार होत असून, या योगानंतर शतभिषा नक्षत्र सुरू होईल. त्याचवेळी परिध योगानंतर शिवयोग सुरू होईल. यासोबतच शिवपूजेच्या वेळी केदार योग राहील.

           गुरुवार १७ फेब्रुवारीपासून राहील फाल्गुनचा रंग---

     फाल्गुन आणि मार्च महिन्यात महाशिवरात्रीबरोबरच इतर सणांनीही रंगत येईल. १७ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात फाल्गुन मार्च महिन्यात सण उत्सवांचे रंग पाहायला मिळतील. पंचांगच्या शेवटच्या महिन्यात भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्याशी संबंधित दोन सण येतात. यापैकी कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री आणि फाल्गुन शुक्ल एकादशीला विष्णूची पूजा करण्याचा दिवस आमलकी एकादशी साजरी केली जाणार आहे. १ मार्चला महाशिवरात्री, २ मार्चला माघ अमावस्या,१४ मार्चला आमलकी एकादशी, १७ मार्चला होळी आणि यानंतर १८ मार्च रोजी रंगांचा सण धुलीवंदन साजरा केला जाणार आहे.

--प्रियांका वाणी
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.