कोरोना चारोळ्या-"मानधन मिळतेय वृद्ध कलाकारांना,बक्षीसच मिळालंय त्यांना दिवाळीला"

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 01:40:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

            विषय :वृद्ध  कलाकारांना  दिवाळीपूर्वी  मानधन  मिळणार
                             मार्मिक  कोरोना  चारोळ्या
   "मानधन मिळतेय वृद्ध कलाकारांना,बक्षीसच मिळालंय त्यांना दिवाळीला !"
  -----------------------------------------------------------------


(1)
उशिरा  का  होईना , कदर  ठेवलीय  सरकारने
"कोरोना"  लागणीनंतरच्या  कित्येक  वर्षाने
वाट  पाहत  डोळे  अधू  झाले  होते  या  "कलाकारांचे" ,
स्टेजला  टाळे  लागले  होते , चीज  होत  नव्हते  कलेचे .

(2)
आज  "मानधन"  मिळतंय  "कलाकारांना  वृद्धापकाळी"
स्टेज  गाजविला  होता  कलेने  त्यांच्या , तरुणकाळी
खितपत  होते , मागण्या  मागता  अश्रू  सुकले  होते ,
चार  भिंतींआड  त्यांचे  जीवन  भकास  उरले  होते .

(3)
आज  या  "कलाकारांची  दिवाळी"  उल्हासमय  आहे
त्यांच्या  घराचे  अंगण  पणत्या , कंदिलांनी  प्रकाशमय  आहे
उर्वरित  आयुष्याचीही  सोय  करावी  सरकारने , "मानधना" -व्यतिरिक्त ,
आयुष्यभर  त्यांनी  या  कलेची  उपासना  केलेली  आहे .

(4)
कलेची  शेवटी  कदर  कळलीय  सरकारला
पण  त्यासाठी  "कलाकारांना  वृद्ध"  व्हावे  लागते  ?
इतका  उशीर  त्यांना  हे  "मानधन"  मिळायला  ?
मिळण्यासाठी  आयुष्यभर  त्यांना  वाट  पाहावी  लागते  ?

(5)
"कोरोनाने"  या  "कलाकारांचेही"  जीवन  उद्ध्वस्त  केलंय
कलेला  आपल्या  कराल  विळख्यात  बंदिस्त  केलंय
स्टेज  होता  मोकळा  त्यांचे  कलागुण  दाखवायला ,
त्या  स्टेजलाही  "कोरोनाने"  आज  टाळ  लावलय  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.