II महाशिवरात्री II-हार्दिक शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 02:09:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II महाशिवरात्री II
                                     हार्दिक शुभेच्छा क्रमांक-1
                                   -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

     या लेखात महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश व समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

     आपल्या देशात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान शंकर पहिल्यांदा प्रकट झाले होते. भगवान शंकर अनेक शक्तींचे स्वामी आहेत. म्हणूनच शिव हेच शक्ति आहेत असे देखील संबोधले जाते. महाशिवरात्री च्या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये महादेवाची पूजा अर्चना केली जाते. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देखील पाठवले जातात.

     आजच्या या लेखात आपण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Mahashivratri wishes in Marathi images पाहणार आहोत. या महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी ला पाठवू शकतात. आणि महाशिवरात्री चे अभिवादन करू शकतात.

भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
--महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!

महादेवामुळे संसार आणि
महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद
महादेवाची भक्ती आहे.
--हर हर महादेव

न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
--महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे
--हर हर महादेव

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शिव सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शिव अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
--महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशमराठी.कॉम)
                       -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.