II महाशिवरात्री II-हार्दिक शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 02:13:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II महाशिवरात्री II
                                    हार्दिक शुभेच्छा क्रमांक-3
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

चालतोय उन्हात
महादेव तुमची छाया आहे
शरण तुमचीच खरी
बाकी सर्व मोहमाया आहे

हसून देतो मी जेव्हा लोक दगा देतात
कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,
की सोबत तर फक्त महादेव देतात..!
--ओम नमः शिवाय

आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवन
मंगलमय होवो.
--हर हर महादेव...!

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणतेही दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

लोकांच्या नजरेत चांगले बनण्याची ईच्छा नाही माझी
बस फक्त तुमच्या नजरेतून पडू नये एवढा प्रयत्न आहे माझा.
--हर हर महादेव

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशमराठी.कॉम)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.