II महाशिवरात्री II-हार्दिक शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 02:18:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II महाशिवरात्री II
                                    हार्दिक शुभेच्छा क्रमांक-6
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
--महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी...
हर हर महादेव
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आहे ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ
महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
--Happy Mahashivratri 2022

शंकराची शक्ती, शंकराची भक्ती
आनंदाची होईल उधळण
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर
प्रत्येक पावलावर मिळेल यश
--महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
--महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा !

हर हर महादेवचा होऊ दे गजर....
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा
आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस
आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं !
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
--ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा !
--Happy Mahashivratri 2022

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं
झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
--महा शिवरात्रीच्या शुभेच्छा !

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो...
ओम नमः शिवाय !
--हैप्पी महाशिवरात्री !

काल पण तूच महाकाल पण तूच
लोक ही तूच त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल, हर हर महादेव !
--महाशिवरात्रीच्या शुभेच्छा


--संदीप सोळंकी
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फ्री हिंदी विशेश.कॉम)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.