ओझरती जखम जुनी

Started by Abhishek D, May 20, 2010, 10:29:49 PM

Previous topic - Next topic

Abhishek D



ओझरती जखम जुनी
ओझरती वेदना
हलकासा स्पर्श तुझा
पाझर माझ्या मना
.
ओसरत्या श्रावणात
इंद्रधनू पुसटसे
धूसर अस्तित्त्व तुझे
असले नसलेसे
.
रसरसता देस राग
निषाद सरसरता.
ऋषभ मनी रुतलेला
अवेळीच सलता
.
व्रण आहे नाहीसा
ओसरती वेदना
सुकलेला काहीसा
पाझर माझ्या मना
.
ओझरती जखम जुनी
आस जुन्या मलमाची
हलकासा स्पर्श जुना
फ़ुंकर गत जन्माची