"०१-मार्च –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 04:55:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे"दिन-विशेष"


                                     "०१-मार्च –दिनविशेष"
                                    ---------------------


अ) ०१ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१५६५: रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

१८०३: ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

१८७२: यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

१८७३: ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

१८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

१८९६: हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.

१९०१: ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.

१९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

१९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

१९३६: अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.

१९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

१९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.

१९६१: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.

१९६१: युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.

१९९२: बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

१९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

=========================================

ब) ०१ मार्च रोजी झालेले जन्म.
   ------------------------

१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)

१९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)

१९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

१९६८: क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.

१९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.

=========================================

क) ०१ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   ------------------------

१९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)

१९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

१९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)

१९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)

१९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)

२००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)

२०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.