परीक्षाकॉपी-चारोळ्या-"लपविलास तूतुझा मोबाईल मास्कखाली,परीक्षेततूअशीही कॉपीकेली?"

Started by Atul Kaviraje, March 04, 2022, 01:48:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय :पुणे -पिंपरी  चिंचवड  येथे , पोलीस  भरती  परीक्षेत , मास्क -मध्ये  मोबाईल  लपवून  कॉपी  करण्याचा  प्रयत्न .
              परीक्षा - कॉपी  अनोखा  आधुनिक  अंदाज  चारोळ्या
   "लपविलास तू तुझा मोबाईल मास्कखाली,परीक्षेत तू अशीही कॉपी केली?"
--------------------------------------------------------------------------


(1)
ऐकावे  ते  नवलंच  घडले  होते ,पुण्यक्षेत्री , पुण्यात , पिंपरी -चिंचवडी
पोलीस  भरती  परीक्षा  होती  सुरु , परीक्षेची  जवळ  आली  होती  घडी
अहो , आधुनिक  तंत्रज्ञानाचा  चमत्कार  तर  ऐका , तुम्ही  सारे  सवंगडी ,
"कोरोनाच्या  मास्कमध्ये"   "कॉपी -मोबाईल"  चक्क  मारून  बसलाय  दडी .

(2)
काय  म्हणावे  या  "कॉपी"   करणाऱ्या  परीक्षार्थींना , परीक्षेस  बसणाऱ्यांना  ?
गेले  दिन  तेव्हाचे  जेव्हा , होत  होती  "कॉपी"   कागदावरुनी  !
आधुनिक  तंत्रज्ञानाचा  करीत  अवलंब , नवल  की  हो  घडतंय ,
"मास्क"-खाली लपवलंय ,बोलणे  होतंय ,ब्ल्यू -टूथ  वरुनी , परीक्षेत  "मोबाइलवरुनी" .

(3)
कोरोनाच्या  काळी  "मास्क"  वापरा , निर्देश  होते  सरकारचे
या  "मास्कने"  जीवनदान  दिले  होते , प्राण  वाचवले  होते , अनेकांचे
असा  हा  "मास्क" , असाही  यावा  कमी , शक्कलच  आहे  नामी ,
क्षणभर  मती  झाली  होती  कुंठित , चक्रावले  होते  सारे  पोलीस -कर्मी .

(4)
या  मानवाच्या  मेंदूतून  अद्भुत  कल्पना  होताहेत  साकार
पण  त्याचा  वापर  व्हावा  योग्य  ठिकाणीच , असं  वाटतंय  फार
"मास्क"  काही  "मोबाईल"  लपविण्यास , "कॉपी"  करण्यास  नाही  दिलाय ,
विध्यार्थ्यांना  आयताच  मिळतोय  याचा  फायदा , विसरलेत  ते  सरावाला , अभ्यासाला .

(5)
पुणे  विद्येचं  माहेरघर , येथे  असाही  केला  जातोय  विचार/अविचार  ?
अध्ययनाचे ,अभ्यासाचे  एव्हढे  का  वावडे , आजच्या  पिढीला  ?
सर्व  काही  हवंय  रेडिमेड  , नोकरी -पैसा  मेहनत  न  करता  !
आधुनिक  तंत्रज्ञानाबरोबरच  हवा , मनोनिग्रहही  काही  करून  दाखवता  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2022-शुक्रवार.