माझी आस.. माझ्या श्वास..

Started by @गोविंदराज@, March 04, 2022, 09:00:36 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

माझ्या जीवाची जिवलग आहेस तु...
माझ्यासाठी खूप अलग आहेस तु ...

स्वप्न नसुन वास्तव आहेस तु ...
काळजात धग धगणारा विस्तव आहेस तु ...

मनाची ना थांबणारी घालमेल आहेस तु ...
या आयुष्याचा जणू ताळमेळ आहेस तु ...

हवेत अलगद झुलणारा झोका आहेस तु ...
या हृदयाचा ना चुकणारा ठोका आहेस तु ...

न संपणारा एक प्रवास आहेस तु ...
माझी आस ... माझ्या श्वास आहेस तु ...

गोविंदराज
०४.०३.२०२२

Satyjeet

हृदय स्पर्शी शब्द रचना.. मनाला भावणारे बोल.. खूप छान.. असच नेहमी आम्हाला काव्याचा आनंद मिळावा..धन्यवाद.!