कार-चोरीचारोळ्या-"लिफ्ट कुणालाही देऊ नका यापुढे,अन्यथा तुमच्याच नुकसानीत भर पडे"

Started by Atul Kaviraje, March 05, 2022, 01:40:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : भंडारा  येथे  लिफ्टच्या  बहाण्याने , कIर -चालकांना  गुंगीचे  औषध (झोपेच्या  गोळ्या) देऊन  कIर  चोरणारी टोळी  जेरबंद .
                       वास्तव - कार-चौर्यकर्म चारोळ्या
    "लिफ्ट कुणालाही देऊ नका यापुढे,अन्यथा तुमच्याच नुकसानीत भर पडे"
-------------------------------------------------------------------------


(1)
टोळी  झालीय  सक्रिय , कार्यरत , "कार"  चोरण्याऱ्यांची  शहरभर
गोड  बोलून  पाशात  अडकवायचे , आणि  गुंगीचे  औषध  द्यायचे
सहजी  फसतोय , "कार" -मालक ,"कार" -चालक ,त्यांच्या  लाघवी  बोलण्याला ,
"लिफ्टच्या"  बहाण्याने ,"कार"  चोरीच्या  उद्देश्याने , "कारमध्ये"  घुसलेल्या  चोराला .

(2)
इतपत  गाफील  कसे  हे  राहती  "कार"  चालवणारे  ?
की  रस्त्यावर  कोणालाही  "लिफ्ट"  त्यांनी   द्यावी  ?
इतकी  नकोय  सहानुभूती , सहजी  फसून  त्यांच्या  जाळ्यात ,
मग  त्यांचेवर  ही  दयनीय  अवस्था  ओढवावी ,चक्क  फसगतच  व्हावी .

(3)
"कारचालक"  कसा  काय  होतोय  वश , त्यांच्या  भूल -थापांना  ?
की  सहजची  पितोय  त्यांनी  दिलेल्या  गुंगीच्या  औषधाना   ?
बहुतेक  नजर -बंदीचा ,वशी -करणाचाच  हा  असावा  एक  भाग ,
अन्यथा  कसा  काय  बसू  देईल  तो  "कारमध्ये"  त्रयस्थांना  ?

(4)
भंडाऱ्यात  घडलेली  ही  आणि  एक   हास्यास्पद  घटना
उद्या  सगळीकडेही  घडू  शकते , विना -विलंब  पाहता -पाहता
आयुष्यभर  पुंजी  साठवून ,पै  पै  जोडून , वाहन  खरेदी  करायचे ,
आणि  नजरेसमोर , स्वतःच्याच  चुकीने , ते  चोरी  होताना  पाहायचे  !

(5)
भक्कम  यंत्रणा  ट्राफिक  पोलिसांची  हवी  कार्यरत  रस्त्यावर
नजर  हवी  करारी ,कडक ,या  "कार" -चोर  टोळींवर
"कार" -चालकांनीही  रस्त्यात  लिफ्ट  देताना , शंभरदा  करावा  विचार ,
विवेक -बुद्धी  असावी  नेहमीच  शुद्धीत , करुनी  विचार  सर्वथा  सारासार .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.03.2022-शनिवार.