" पसारा ???"

Started by Ashok_rokade24, March 05, 2022, 02:30:19 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

पसारा जखमांचा,उपचार किती करावा ,
स्वर आर्त वेदनांचा शांत कसा करावा ,

जागा नसे जखमांना कैक नाराज होती,
राहती सज्ज नेहमी घेऊन शस्र हाती ,
खोलवर जखमा सामना किती करावा,
स्वर आर्त वेदनांचा शांत कसा करावा ,

अट्टाहास जगण्याचा जिवन व्याकूळले,
बिज हे संघर्षाचे पदोपदी पेरलेले ,
तीर शब्दांचे होती वाढतो नित दुरावा ,
स्वर आर्त वेदनांचा शांत कसा करावा ,

होतील फुले अश्रूंची वाट किती पहावी ,
घाव आपुलेच देती सुटका कशी व्हावी ,
लपंडाव हाआयुष्याचा कसा संपवावा ,
स्वर आर्त वेदनांचा शांत कसा करावा ,

कितीही तह केले संघर्ष सुरूच आहे ,
माघार घ्यावी किती वाट संपलेलीआहे ,
नको आता जहर शब्दांचे नको दुरावा ,
स्वर आर्त वेदनांचा शांत कसा करावा ,

अशोक मु.रोकडे.
मुंबई.