II आंतरराष्ट्रीय महिला दिन II-लेख क्रमांक-1-अ

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 12:29:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II आंतरराष्ट्रीय महिला दिन II
                                        लेख क्रमांक-1-अ
                                -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

         हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना कशी सुचली?---

     ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

     सर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण 109वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.

     पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती 'Celebrating the Past, Planing for the Future' (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना).

                      8 मार्च हीच तारीख का?---

     8 मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात, हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल. खरंतर क्लारा जेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नव्हती.

     1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी 'ब्रेड आणि पीस' (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

                  आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो का?---

     तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो. जागतिक पुरूष दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. 1990 सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

     60 हून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, जेंडर रिलेशन, लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं, हा यामागचा उद्देश आहे. 2019 च्या जागतिक पुरुष दिनाची थीम होती 'Making a Diffrence for Men & Boys'.

                 जगभरात कसा साजरा होतो आंतरराष्ट्रीय महिला दिन?---

     अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते. रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुलं देतात.

     चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते. तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना 'Women's History Month' म्हणून साजरा करतात.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बीबीसी.कॉम)
                       --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.