II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 01:19:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II जागतिक महिला दिन II
                                      शुभेच्छा संदेश क्रमांक-1
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

         जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि सुविचार---

     आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन (jagtik mahila din quotes in marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला (mahila din) एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या महिला दिन माहिती, का साजरा केला जातो महिला दिन, शिवाय या खास दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना पाठवा या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश (womens day wishes in marathi), जागतिक महिला दिन स्टेटस मराठी (womens day status in marathi), महिला दिवस कोट्स मराठी (womens day quotes in marathi), मेसेजेस मराठी (womens day sms in marathi) आणि सुविचार (womens day thoughts in marathi)

     महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासोबत काही लोकप्रिय महिलांचे प्रेरणादायी संदेश / कोट्स (womens day quotes in marathi) शेअर करत आहोत

1. कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल – सुधा मुर्ती

2. स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता – पी. व्ही. सिंधू

3. स्वप्नांचा पाठलाग करा आणि संयमी राहा – अॅंजेलिक केर्बर

4. तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. – ऑप्रा विन्फ्रे

5. तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत उभं राहण्यासाठी – जे. के. रोलिंग

6. इतरांना धक्का न देताही तुम्ही शिखर गाठू शकता – टेलर स्विफ्ट

7. जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते  – ब्रिघम यंग

8. संशय हा एक खूप मोठा शत्रू आहे. आपण कोण आहोत आहेत आपला जन्म कशासाठी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे  – जेनिफर लोपेझ

9. प्रत्येक व्यक्तीने कठीण परिस्थितीला तोंड देण्यास आणि जोखिम घेण्यास तयार असावं – प्रतिभाताई पाटील

10. तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती  शक्तीशाली आहे – अॅटिकस

11. महिला नेहमीच विजयी राहतील – महादेवी वर्मा

12. प्रेम म्हणजे  काय हे फक्त महिलाच जाणू शकतात – मोपासा

13. महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे- महात्मा गांधी

14. महिला या पृथ्वीप्रमाणे धैर्यवान, शांतीसंपन्न आणि सहिष्णू असतात – प्रेमचंद

15. जी महिला आदर्श स्त्री असते ती आदर्श पत्नी होऊ शकते, महिलांच्या हातात लक्ष्मी नांदते – प्रेमचंद

16. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य व दुःख कायम वास करतात – सदगुरू श्री वामनराव पै

17. घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पावलांने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते – सदगुरू श्री वामनराव पै

18. स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे – सुर्यकांत त्रिपाठी निराला

19. स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे – भगवतीचरण वर्मा

20. एखाद्या कठोर आणि दुराचारी व्यवहाराला प्रेम आणि मायेने बदलण्याचे  सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे – शरदचंद्र


--तृप्ती पराडकर
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.