II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 01:21:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II जागतिक महिला दिन II
                                      शुभेच्छा संदेश क्रमांक-2
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     महिलादिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास महिलांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा संदेश (womens day messages in marathi) तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.

1. तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

2. तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

3. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

4. विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू. एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

5. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

6. स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

7. स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

8. जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा

9. विधात्याने घडवली सृजनांची सावली, निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. महिला दिनाच्या शुभेच्छा.

10. ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11. तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. महिला दिनाच्या शुभेच्छा.

12. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.


--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.