II जागतिक महिला दिन II-कविता क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 01:25:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                          कविता क्रमांक-2
                                    --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त काही कविता---

===================================
जागतिक महिला दिन कविता मराठी | Mahila Din Kavita
====================================

     देशाच्या प्रगतीत सर्वच क्षेत्रातील महिलांचे योगदान वाढत आहे.प्राचीन काळापासून महिलांना देश, समाज, घर, कुटुंब व इतर गोष्टींचा आधार मानले जाते. म्हणूनच म्हटलं जातं की स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं.

     आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित ही खास महिला दिवस कविता मराठी तुम्हीही शेअर करा.

जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती,
तिच्यामुळे तिवतात दिव्या मधील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई,
शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई,
रणांगणावर लढते जसी देवी झलकारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

शक्ती पीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान,
तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान,
ती विठूची ती आषाढीची वारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

नारी मुळे माणसांची आहे जगभर कीर्ती,
ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती,
घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.


--मराठी डिजिटल
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.