वीज-चोरी-चारोळ्या-"विजेचा मीटर मी स्वतः हाताळतो,विजेच्या बिलात आकडेमोड करतो"

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 02:28:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय :विजेच्या  वापराची  कमी  नोंद  करून  वीज -मंडळाची  फसवणूक
                    वास्तव  मार्मिक  वीज -चोरी  चारोळ्या
      "विजेचा मीटर मी स्वतः हाताळतो,विजेच्या बिलात आकडेमोड करतो"                 ---------------------------------------------------------------------


(1)
मला  अनुभव  या  क्षेत्रात , पूर्वीपासूनच
COURSE  केलाय  मी  IIT-त  FIRST CLASS ELECTRICIAN-चा
माझ्या  घराचा  "वीज -मीटर"  मी  स्वतः  हाताळतो ,
आणि  माफक  "वीज -बिल"  मी  स्वतःच  तयार  करतो .

(2)
आतापर्यंत  फसवत  आलोय  मी  "वीज -महामंडळाला"
त्यांचाही  माझ्यावर  अतोनात  आहे  विश्वास
"विजेत"  लाखांची  बचत  करून  मी  पैसे  गुंतवलेय  बँकेत ,
ठेवींवर  चक्र -वाढ -व्याज  मिळून  वाढही  होतेय  रकमेत .

(3)
मीच  का  ठेका  घेतलाय  इमानदारीचा 
जिथे  गावोगावी  "वीज -चोर"  भरलेत  असंख्य
सहीसलामत  सुटतात  तेही , काहीही  शिक्षा  न  होता ,
गुंगारा  देऊन  "वीज -मंडळास" , चुटकीसरशी  पहाता -पहाता .

(4)
आहे  गुन्हा , आहे  फसवणूक , माहिताहे  मला
शिक्षाही  आहे  कठोर , या  "विजेच्या  चोरीला"
पण  रिस्क  तर  आयुष्यात  घ्यावीच  लागते ,
"विजेचे"  वाढते  भरमसाट  "बिल"  डोळ्यांत  पाणी  आणते .

(5)
"वीज  वापर"( ELECTRICITY CONSUMPTION) मी आजही  कमी दाखवून
"वीज  मीटरमध्ये"  स्वतःच  फेरफार , "आकडेमोड"  करतो
नंतरचे  नंतर  पाहून  घेऊ , जेव्हा  येईल  गुन्हा  उघडकीस ,
पण  आज  या  "विजेचा"  मी  पूर्णपणे  उपभोग  घेतो .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.