II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:49:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                       शुभेच्छा संदेश क्रमांक-3
                                   ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     काही विचार जीवन जगण्याचं बळ देतात. यासाठी काही प्रसिद्ध महिलांचे हे विचार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

1. कोणतीही टीका गांभिर्याने घ्या पण वैयक्तिक नको कारण टीकेमधील सत्यता आणि अचूकपणा तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तिच्याकडे दुर्लक्ष करणंच बरं – हिलरी क्लिंटन

2. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई

3. जर तुम्हाला डोअरमॅट व्हायचं नसेल तर वरच्या मजल्याच्या दिशेने झेप घ्या – अल अॅनन

4. प्रत्येक महिलेचं संरक्षक कवच म्हणजे तिचं धैर्य – एलिझाबेथ कॅडी स्टॅनन

5. स्वतःशी कधीच तडजोड करू नका. कारण तुम्हाला जे हवं आहे हे काल आणि उद्या नाहीतर तुम्हाला आजच मिळणार आहे – जेनिस जोपलिन

6. लोक प्रयत्न  करायचं सोडून देतात कारण त्यांना त्यांच्या हातात काहीच नाही हे वाटत असतं. – अॅलिस वॉकर

7. तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे – शैयला मॅरे बेथेल

8. प्रत्येकीकडे गुड न्यूज आहे. तुम्ही किती ग्रेट आहात, तुम्ही इतरांवर किती प्रेम करू शकता आणि काय काय साध्य करू शकता, तुमच्या क्षमता काय आहे हे तुम्हाला माहीत नाही – अॅने फ्रॅंक

9. तुम्ही फार सुंदर आहात मात्र तुम्ही  किती सामर्थ्यवान आहात हे तुम्हालाच माहीत नाही – मेलिसा इथरिज

10. तुम्हाला तुमच्यावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं हे जाणून घ्यायचं असेल तर आरश्यात पाहा – बायरन केटी

11. एक यावा असा दिन, ना राहो महिला 'दीन' आणि रोजच असावा 'जागतिक महिला दिन'

12. खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठ मोठी शिखरं सर करणाऱ्या माझ्या परिचयातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!


--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.