II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:51:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                       शुभेच्छा संदेश क्रमांक-4
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना सशक्त करण्यासाठी काही शुभेच्छा संदेश नक्की वाचा.

1. यशस्वी व्हायचं असेल तर तयार व्हा आणि कामाला लागा. कारण तुम्हाला आता प्रचंड मेहनत घ्यायची आहे – टोरी बर्च

2. मी यशस्वी आहे कारण मला आयुष्यात कामे न करण्याची कारणे देणं आवडत नाही – फ्लोरेन्स नाईटिंगेल

3. आपल्या स्वतःच्या अटींवर यशाची व्याख्या तयार करा. तुमच्या स्वतःच्या नियमांवरच ते मिळवा आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल अभिमान बाळगा – अॅने स्विनी

4. तुमचं सामर्थ्यच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं – मॅरेल स्ट्रिप

5. आपला प्रत्येक निर्णय योग्य असेलच असं नाही. कधी कधी आपला निर्णयही चुकू शकतो. हे माहीत असेल तर अपयश तुमच्या यशाच्या आड येणार नाही उलट येणारं अपयश तुमच्या यशाचा एक भाग असेल – एरियाना हफिंग्टन

6. मी कधीच यशाचं स्वप्न पाहत बसत नाही उलट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागते – एस्टी लॉडर

7. मी कोणताच पक्षी नाही किंवा कोणतंही जाळं मला अडवू शकत नाही. कारण मी एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे मी माझ्या तत्वावर जगते – शार्लोट ब्रोंटे

8. तुमच्या आयुष्याची अभिनेत्री व्हा म्हणजे तुम्ही कोणाला बळी पडणार नाही – नोरा एफ्रोन

9. पुरूष महिलांशिवाय काय करतील? फक्त चिडचिड आणि चिडचिड – मार्क ट्वेन

10. एक स्त्री म्हणून माझा कोणताच देश नाही. एक स्त्री म्हणून मला कोणताच देश नको. एक स्त्री म्हणून हे संपूर्ण जगच माझा देश आहे – व्हर्जिनिया वुल्फ

11. कोणताच देश तोपर्यंत प्रगतीपथावर पोहचू शकत नाही जोपर्यंत त्या देशातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवत नाहीत.

12. देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची कितीपण पूजा करा, नवरात्रीचा अखंड उपवास करा, पण घरातील स्त्रीला आदर नाही दिला तर सर्व काही व्यर्थ आहे.


--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.