II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:54:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                       शुभेच्छा संदेश क्रमांक-6
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     कॉर्पोरेट विश्वातील महिलांना सतत नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. यासाठीच हे विचार त्यांना नक्कीच बळ देतील.

1. अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या महिला करू शकत नाहीत – मिशेल ओबामा

2. एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते – ऑप्रा

3. जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पुरूषाला विचारा मात्र जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर ती एखाद्या महिलेलाच सांगा – मार्गारेट थॅचर

4. स्वतःसाठी विचार करणे ही एक ध्यैर्यपूर्ण कृती आहे – कोको चॅनल

5. जीवन ही एक परिक्षा आहे जिथे कोणताच अभ्यासक्रम नाही,  प्रश्नपत्रिकादेखील सेट केलेली नाही एवढंच नाही तर तुमच्याकडे कोणत्याही उत्तरपत्रिकेचं आदर्श मॉडेलही नाही. – सुधा मुर्ती

6. यश, पुरस्कार, पदवी किंवा पैशांपेक्षा चांगले नातेसंबंध, दया आणि मानसिक शांती माणसासाठी फार महत्त्वाची आहे –  सुधा मुर्ती

7. आपल्याला स्वतःविषयीची निर्माण केलेली धारणा बदलण्याची गरज आहे. तरच आपण महिला म्हणून उभं राहू आणि नेतृत्व करू शकू – बियॉन्से

8. कोणतीच महिला तिच्या शरीराविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही असं नाही. कारण  जेव्हा तिच्या हक्कावर हल्ला होतो तेव्हा ती लढू शकते – कमला हॅरीस

9. जी स्त्री तिचं मत मांडू शकते ती कणखरच असते – मेलिंडा गेट्स

10. स्त्रीवाद महिलांना कणखर बनवू शकत नाही कारण त्या आधीच कणखर आहेत. फक्त लोकांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कणखर करण्याची गरज आहे – जी. डी. अॅंडरसन

11. स्त्रीयांना द्या इतका मान की वाढेल आपल्या देशाचा मान

12. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. महिला दिनाच्या शुभेच्छा


--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.