II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:55:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                       शुभेच्छा संदेश क्रमांक-7
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     बायको ही प्रेयसी, सहचारिणी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणूनच तिला या खास दिवशी एखादा खास मेसेज पाठवायलाच हवा.

1. प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.

2. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

3. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 

4. ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत...तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

5. तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो...जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा

6. यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

7. पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या  शुभेच्छा

8. जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

9. महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

10. तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

11. जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

12. सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा


--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.