II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:57:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II जागतिक महिला दिन II
                                      शुभेच्छा संदेश क्रमांक-8
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     आई ही व्यक्तीच अशी आहे तिच्यामुळे या जगात आपला जन्म होतो. आईची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही खूपच छान संधी आहे.

1. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

2. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून  आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई

3. ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

4. आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

5. स्त्री कितीही भित्री असली तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा असतो तेव्हा ती वाघीण होते. म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

6. आई काय करते पेक्षा आई काय काय नाही करत हा प्रश्न मला पडतो आणि आईच्या संस्कारांची जाणिव होते. आई तुझे किती उपकार मानू... जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

7. आई नसेल तर मुलं पोरकी होतात पण खूप कमी लोकांना माहीत असेल अशा पोरक्या झालेल्या बाळांवरही आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची बरसात करतच असते.

8. आई  तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला. तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू... जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

9. आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.

10. मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या अनंत मातांना माझा शाष्टांग नमस्कार... जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा

11. तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

12. माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा, तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा. आई महिला दिनाच्या शुभेच्छा


--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.