II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:18:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                           शुभेच्छा क्रमांक-2
                                     --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Women's Day Wishes in Marathi | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
=========================================

     स्त्रियांचा आदर हा फक्त १ दिवस नाही तर तो दररोज केला गेला पाहिजे. स्त्रिया कोणत्याही दिवशी सुट्टी घेत नाहीत.कधी ऑफिस किंवा घरी त्या दिवसभर काम करत असतात.

     महिलांना प्रत्येक क्षेत्रात समानता आणि समान अधिकार मिळावेत म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन (happy women's day wishes in Marathi) साजरा केला जातो. या दिवशी जगातील सर्व देश, मग ते विकसित असोत वा विकसनशील, एकत्रितपणे महिलांच्या हक्कांबद्दल बोलतात.

     आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही देखील हे अभिनंदन संदेश (happy women's day wishes in Marathi) पाठवा.

ती प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी.
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री मध्ये असते शक्ती अपार,
स्त्री आहे या सृष्टीचा आधार,
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

रात्री रस्त्यावरुन जाणारी
प्रत्येक मुलगी,
ही संधी नसून जबाबदारी आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला,
--जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


--मराठी डिजिटल
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.