II जागतिक महिला दिन II-संदेश

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:20:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                                 संदेश
                                     -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Women's Day Message in Marathi | महिला दिनाचे संदेश
=========================================

     या महिला दिनानिमित्त (international women's day wishes in Marathi) असे काहीतरी करा ज्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या सर्व महिलांना स्वतःचा अभिमान वाटेल.हा दिवस साजरा करण्यासाठी, महिला दिनाविषयीचे सूविचार शेअर करा (world women's day wishes in Marathi).

     जर तुम्हाला कोणत्याही स्त्रीबद्दल आदर वाटत असेल तर ही संधी सोडू नका आणि तिला तुमच्या मनातल्या भावना सांगा.

जी नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,
मग तिलाच का केवळ त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने,
करा तिचा सन्मान.
--महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
शिकून सावरतील दुनिया सारी.
ती आहे म्हणून हे विश्व आहे.
ती आहे म्हणून घराला घरपण आह.
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
--जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
--आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.


--मराठी डिजिटल
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.