II जागतिक महिला दिन II-शायरी

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:23:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                                शायरी
                                     -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Women's Day Shayari in Marathi | आंतरराष्ट्रीय महिला दिन शायरी
=========================================

     समाजाला सुसंस्कृत बनवण्यापासून देशाच्या विकासात स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे.

     हा उत्साह आणि जोश दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर महिलांना त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारांबद्दल सांगितले जाते.

     या दिवशी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आणि समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांचे मनोबल उंचावले जाते.

     या प्रसंगी, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील सर्व महिलांना विशेष वाटेल असे काहीतरी करा.आंतरराष्ट्रीय महिला दिन शायरी (Women's Day Quotes in Marathi) पाठवा.

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे.
--महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

इंग्रजीत म्हणतात लेडी,मराठीत म्हणतात महिला
जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला,
अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान,
कायम करा अशा स्त्रीचा सन्मान.
कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी,
बहीण तू, तू सरती सोबती,
अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी,
आईत तूच मायेची माऊली,
पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा.
--महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

कर्तृत्व विशाल, ऊर्जेची मशाल.
--जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


--मराठी डिजिटल
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.