II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:26:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II जागतिक महिला दिन II
                                            शुभेच्छा क्रमांक-3
                                     --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Women's Day Quotes for Mother in Marathi | आईसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश
=========================================

     जेव्हा आपण महिलांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला शब्द आठवतो तो म्हणजे आई. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान सर्वात विशेष असते.

     आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आईला शुभेच्छा द्या.सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला दिवस शुभेच्छा संदेश (Womens Day Quotes in Marathi) आईला पाठवा आणि तिचा दिवस खास बनवा.

पूर्वजनमाची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
आई ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरान पेक्षा,
९ महिने जास्त ओळखत असते.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

तुझ्यामुळे जन्म माझा,
पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे,
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.

देव दिसला आई मज
तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्याला स्त्री,आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.


--मराठी डिजिटल
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.