II जागतिक महिला दिन II-माहिती

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:30:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                                माहिती
                                     -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

====================================
जागतिक महिला दिनबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ's)
====================================

--जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो?
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.

--जागतिक महिला दिन का साजरा केला जातो?
महिलांना प्रत्येक क्षेत्रात समानता आणि समान अधिकार मिळावेत म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर महिलांना त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारांबद्दल सांगितले जाते.

--पहिली जागतिक महिला परिषद कुठे झाली ?
17 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद झाली.

--आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 ची theme काय आहे?
या वर्षीच्या जागतिक महिला दिन 2022 दिनाची theme आहे – शाश्वत उद्यासाठी आजपासून स्त्री पुरूष समानता.


--मराठी डिजिटल
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.