"०९-मार्च–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 10, 2022, 12:24:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-०९.०३.२०२२-बुधवार होता.जाणून घेऊया, कालच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०९-मार्च–दिनविशेष"
                                   --------------------


अ) ०९ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

१९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

१९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

१९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.

१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

=========================================

ब) ०९ मार्च रोजी झालेले जन्म.
  -------------------------

१८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)

१८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

१८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

१९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

१९३४: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)

१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

१९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

१९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

=========================================

क) ०९ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   -------------------------

१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

१८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१८८८: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७)

१९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)

१९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०८)

२०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)

२०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2022-गुरुवार.