सुरक्षा चारोळ्या-"हेल्मेट घाला,वाहन नीट चालवा,अपघात टाळा,स्वतःला वाचवा"

Started by Atul Kaviraje, March 10, 2022, 01:56:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय :गोंदियात  विना -हेल्मेट  गाडी  चालविण्याऱ्यांवर  कारवाई
                   वास्तव -गाडी  चालक  सुरक्षा  चारोळ्या
                       ( ट्राफिक  पोलिसांचे  मनोगत  )
      "हेल्मेट घाला,वाहन नीट चालवा,अपघात टाळा,स्वतःला वाचवा"
    ----------------------------------------------------------


(1)
तुमच्या  सुरक्षेच्या  दृष्टीनेच  उचलली  जाताहेत  ही  पाऊले
यामध्ये  कुणाचाही  काहीही  नाहीय  स्वार्थ , स्व -हित
चालकांनो , जिथे  तुम्हालाच  आहे  "हेल्मेट"  घालण्याचे  वावडे ,
चूक  आहे  तुमचीच , "ट्राफिक  पोलीस"  त्यांना  देताहेत  शिस्तीचे  धडे .

(2)
पुढे  होऊ  नये  चूक  तुमच्याकडून , म्हणून  ही  खबरदारी
पावती  फाडल्यावर  राहील  लक्ष्यात , तुमची  ही  जबाबदारी
घरून  निघतानाच  "हेल्मेट"  जरूर  स्वतःबरोबर  बाळगावे ,
नुसते  बाळगू  नये , तर  ते  डोक्यावरही  परिधान  करावे .

(3)
आम्हालाच  वाईट  वाटतं , तुमच्याकडून  दंड  वसूल  करताना
पण  काय   करावे , आमची  ही  ड्युटी  आहे , आम्हालाही  दिलेत  निर्देश
"हेल्मेट"  घाला , अपघात  टाळा , झाला  तर  तुम्हालाच  ते  वाचवेल ,
ईजा  झाली  धडालाच   तरी  डोके  नक्कीच  सुरक्षित  असेल  !

(4)
कृपया  रहदारीचे  सारे  नियम  पाळा  प्रकर्षाने , चालकांनो
स्पीड  लिमिट  ठेवा , तुमच्यावर  आहे  आमचे  लक्ष
वेळीच  तुम्हाला  सावध  करतोय , तुमची  काळजी  वाहतोय  सर्वथाही ,
वाचवतोय  आम्ही  तुम्हाला , काळाने  करण्याआधीच  तुम्हाला  भक्ष .

(5)
या  कारवाईचा  चालकांनो , राग  मानू  नका , दुट्टपी  वर्तन  करू  नका
आम्हाला  सहकार्य  द्या , तुमच्यासाठीच  आम्ही  उभे  आहोत  भर  उन्हात
मनमानी  न  करता ,रस्त्यावरचे  नियम ,कायदा  कसोशीने  पाळा ,
जीवन  आहे  मूल्यवान , एकदाच  मिळते , "हेल्मेट"  घाला , शक्यतो अपघात  टाळा !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2022-गुरुवार.