मादक पदार्थ चारोळ्या-"रसवंतीत उसाचा गोडरस प्या,सोबत गांजा सेवनाने सारे धुंदव्हा"

Started by Atul Kaviraje, March 11, 2022, 01:43:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

       विषय :लातूर  येथे  उसाच्या  शेतात  गांजाची  लागवड
              मार्मिक  वास्तव  मादक  पदार्थ  चारोळ्या
  "रसवंतीत उसाचा गोड रस प्या,सोबत गांजा सेवनाने सारे धुंद व्हा"                     -----------------------------------------------------------


(1)
माझ्या अचानक श्रीमंतीचे रहस्य , कोणालाच  ठाऊक  नव्हते , कधी  कळणारच  नव्हते
वरकरणी  मी  शेतात  "उसाचे"  उत्पादन  घेतले  होते
पण  रात्र  पडताच  गुपचूप  शेतात  जाऊन , नकळत  कोणाच्याही ,
उसापाठी  दडलेल्या  "गांजाच्या"  झाडांस  पाण्याचे  पाट  काढले  होते .

(2)
माझे  शोरूम  "उसाच्या"  कांड्यानी  पुरेपूर  भरले  होते
रसवंतीत , रसप्रेमी  या  अमृत -रसाचे  मनसोक्त  सेवन  करीत  होते
आणि  गोडाऊन -मधील  त्या  स्पेशल  खोलीत , "गांजा"  नशेडी ,
"गांजा" -चिलीम  भरून , ओढून  धुराचे  लोटच्या  लोट  काढीत  होते .

(3)
"उसाच्या"  वाढलेल्या  मनुष्यभर  उंचीच्या  पीक -शेतात
ते  इवलेसे  "गांजाचे"  रोप , अगदी  बेमालूम  दडले  होते
अन  "उसाबरोबर"  मी  "गांजाचीही"  शेती  करून ,
सरकारला  अन  "ऊस" -साखर  कारखानदाऱ्याना  आजवर  खूप  फसवले  होते .

(4)
माझा  हा  गुन्हा  कधीच  उघडकीस  नव्हता  आला
या  मादक  "गांजाने"  मला  मालामाल  होता  केला
आता  मी  माझ्या  शेतीचे  क्षेत्र  अधिकच  विस्तीर्ण  केलंय ,
"उसाच्या"  मळ्यासोबत  मी  "गांजाचेही"  अधिकाधिक  पीक  घेऊ  लागलोय .

(5)
आज  साऱ्या  मुंबईभर  माझे  "गांजा"  नशेडी  भरले  आहेत
हुक्क्यात  ते  तंबाखूच्या  ऐवजी  "गांजा"  भरीत  आहेत
माझ्याही  कळत -नकळत  मी  एक  मोठी  चूक  करीत  आहे ,
"गांजाच्या"   आहारी  नेऊन , आजची  तरुण  पिढी  मी  बिघडवीत  आहे  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2022-शुक्रवार.