ग्रंथपालचारोळ्या-"ग्रंथहेचगुरु ग्रंथपाल सांगताहेत,अनआज ठेचा-भाकर खाऊन राहाताहेत"

Started by Atul Kaviraje, March 13, 2022, 01:58:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय :अकोला  येथे , ग्रंथपाल  अनुदान  हप्ता  थकीत  असल्यामुळे  ग्रंथपालांचे  भाकर - ठेचा  खाऊन  आंदोलन  (धरणे )
                        वास्तव  ग्रंथपाल  अनुदान  चारोळ्या
    "ग्रंथ हेच गुरु ग्रंथपाल सांगताहेत,अन आज ठेचा-भाकर खाऊन राहाताहेत"
----------------------------------------------------------------------


(1)
वचन  ऐकिवात  होते  आजवर  "ग्रंथ"  हेच  गुरु
तेच  "ग्रंथ"  सांभाळणाऱ्या  "ग्रंथपालांचे"  आंदोलन  झालंय  सुरु
वाचकांच्या  वाचनाची  उत्तम  सोय  करणारे  "ग्रंथालयाचे  ग्रंथपाल"  ,
आज  विना -अनुदान  रहाताहेत  खाऊन  फक्त  "ठेचा -भाकर" .

(2)
त्यांचा  पगार , अनुदान  देण्या  पैसे  अपुरा  पडतोय  ?
देशाची  आर्थिक  स्थिती  इतकी  का  बिघडलीय  ?
वाम -मार्गाने  पैसे  मिळविणाऱ्यांचा  तर  इथे  आहे  सुकाळ ,
बिचाऱ्या  प्रामाणिक  "ग्रंथपालांच्या"  जीवनी  भरलाय  फक्त  वेतन -दुष्काळ .

(3)
शाळा  बंद  पडल्या  होत्या  कोरोनाच्या  प्रसारामुळे
नोकऱ्या  गेल्या  होत्या  शिक्षकांच्या,  वर्गातील  फळा  कोरा  होता
"ग्रंथपालांचेही"  काही  कमी  नाहीय  दुखणे , त्यांचा  खिसा  रिक्त  आहे ,
धरणे  धरलेल्या या "ग्रंथपालांच्या"जेवणात  दोन्ही  वेळा  फक्त "भाकरी -ठेचाच" आहे .

(4)
हे  आंदोलनरूपी  धरणं  आज  वेगळे  वळण  घेतंय
नवं -नवी  क्षेत्रे  या  आंदोलनात  असहाय्य , हतबलतेने  उतरताहेत
वेळेवर  त्यांना  मिळत  नाहीय  अनुदान , मिळत  नाहीय  वेतन ,
"ग्रंथपालही"  या  अनोख्या  "ठेचा -भाकर"  आंदोलनात  धरणे  धरून  बसताहेत .

(5)
या  "भाकरी -ठेच्यावरच"  काढायचे  का  दिवस  "ग्रंथपालांनी"  ?
गजबजतेय  "ग्रंथालयाचे"  प्रांगण , त्यांच्या  या  अभिनव  धरणे  धरण्यांनी
त्यांच्यासाठी  "भाकर -ठेचांचे"  खास  स्टोल  लागताहेत ,
आता  असेच  यापुढेही  ते  "ठेचा -भाकर"  खाऊन  जीवन  कंठताहेत  ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2022-रविवार.