जन्म देवा का दिला तू मला मानवाचा

Started by Bhavna Bhalchandra khot, March 13, 2022, 03:15:59 PM

Previous topic - Next topic

Bhavna Bhalchandra khot

जन्म देवा का दिला तू मला मानवाचा
का नाही जन्म दिला तू प्राणी अन् पक्षाचा
जंगलात मुक्त फिरलो असतो अन्‌ आकाशात उंच उडालो असतो.
नसती पैशाची चणचण अन्‌ कामाची वणवण

संपला असता जन्म तर तिथेच पडलो असतो
तर तिथेच कुजलो असतो अन् संपून गेलो असतो
ना कोणाला दुःख अन् ना कोणाला सुख

नसते दहनविधी अन् नसते दिवसकार्य
नसते लागले खांदे तिरडी उचलायला
खोटेच हासणे अन् खोटेच रडणे काहिच उरले नसते