तू मात्र अजून तशीच आहेस

Started by Bhavna Bhalchandra khot, March 13, 2022, 03:30:33 PM

Previous topic - Next topic

Bhavna Bhalchandra khot

मात्र तू अजून तशीssच आहेस


फक्त केस पांढरे झाले आहेत
खळी जाऊन सुरकुत्या आल्या आहेत
मात्र तू अजून तशीssच आहेस


कमर वाकली आहे
तोंडात कवळी आली आहे
मात्र तू अजून तशीssच आहेस


डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे
वयाने पन्नासी गाठली आहे
मात्र तू अजून तशीssच आहेस