कवितेचा जन्म

Started by शिवाजी सांगळे, March 14, 2022, 07:46:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कवितेचा जन्म

कविता कधी सुचते?...नेहमीचा प्रश्न
काय उत्तर द्यावे ? अनुत्तरीत हा प्रश्न

स्मरते केव्हातरी वाऱ्याच्या झुळकेवर
स्फुरते हळूच फुलपाखरांच्या रंगावर

सुचते कधी ती भावनेच्या कल्लोळात
कधी तरी सहजच मनाच्या गोंधळात

सहज भाळते सुंदरीच्या पदन्यासावर
मोगऱ्यासम रेंगाळते तीच्या कुंतलावर

कारणे वर्णावी कशी तीच्या जन्माची
तीच पायरी, तीच मुर्ती शब्द मंदिराची

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९