"१४-मार्च–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 15, 2022, 12:11:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१४.०३.२०२२-सोमवार होता. जाणून घेऊया,कालच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१४-मार्च–दिनविशेष"
                                     --------------------


अ) १४ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

२०००: कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

=========================================

ब) १४ मार्च रोजी झालेले जन्म.
   ------------------------

१८७४: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)

१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)

१८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)

१९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)

१९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)

१९३३: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

१९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

१९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

१९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

१९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

१९७४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

=========================================

क) १४ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   ------------------------

१८८३: जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)

१९३२: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)

१९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

२००३: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९३२)

२०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

२०१८: इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९४२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.03.2022-मंगळवार.