"१६-मार्च–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 16, 2022, 11:52:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.०३.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१६-मार्च–दिनविशेष"
                                    ---------------------


अ) १६ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.

१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

१९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

=========================================

ब) १६ मार्च रोजी झालेले जन्म.
  -------------------------

१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १७६६)

१७५०: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)

१७५१: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १८३६)

१७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८५४)

१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८१)

१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९५२)

१९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

१९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.

=========================================

क) १६ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   ------------------------

१९४५: अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (जन्म: १३ जून १८७९)

१९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८५५)

१९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९१०)

२००७: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९८४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.03.2022-बुधवार.