II होळी II-पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 11:30:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            II होळी II
                                 पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-2
                                ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

2. थंडाई (Thandai Recipe)
------------------------------

     होळीत थंडाई पिण्याची परंपराच आहे. त्यामुळे घरोघरी थंडाई तयार केली जाते. होळीच्या पार्टीसाठी थंडाई करण्यावर जास्त भर दिला जातो. शिवाय होळीच्या दिवसात घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत थंडाईने केले जाते.

                       थंडाईसाठी लागणारे साहित्य---

     साडे चार कप फुल फॅट क्रीम दूध, अर्धा कप पिठी साखर, चिमुटभर केशर, काही थेंब गुलाबपाणी, अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप पिस्ता, दोन चमचे खसखस, दोन चमचे बडीसोप, दोन चमचे टरबूजाच्या बिया, एक चमचा वेलची, अंदाजे वीस काळीमिरीचे दाणे, तीन चार गुलाबाच्या पाकळ्या.

                         थंडाई करण्याची कृती---

     सर्वात आधी दूध गरम करून सामान्य तापमानाला थंड करा. अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप पिस्ता, दोन चमचे खसखस, दोन चमचे बडीसोप, दोन चमचे टरबूजाच्या बिया वीस मिनीटे पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कोमट झालेल्या दूधात साखर मिक्स करा आणि दोन तास फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवून द्या. दोन तासांनंतर त्यात सुक्यामेव्याची वाटलेली पेस्ट टाका. केशर तव्यावर हलके गरम करून कोमट दुधात मिसळून तेही दूधात मिसळा. दूधात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि पुन्हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना गुलाबाचे काही थेंब आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि थंडगार थंडाई सर्वांना द्या.

--तृप्ती पराडकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.