II होळी II-पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 11:37:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                   पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-6
                                  ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

6. पाणीपुरी (Paanipuri)
-------------------------

     पाणीपुरी हे सगळीकडे अतिशय चवीने पदार्थ खाल्ला जाणारा पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय असलेला हा पदार्थ कोणत्याही सणासुदीला आवडीने खाल्ला जातो. पाणीपुरीची तयारी करून ठेवली तर पाहुणे आल्यावर पटकन पाणीपुरी सर्व्ह करता येते.

               पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य---

     पाणीपुरीच्या तयार पुऱ्या, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चिंच-गुळाचं पाणी, जिरे पावडर, पांढरे वाटाणे, कांदा, टोमॅटो, आलं- लसुण पेस्ट, तेल, तिखट, हळद, छोले मसाला, हळद.

                  पाणीपुरी तयार करण्याची कृती---

     पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मिक्सरमध्ये वाटून घ्या, हे मिश्रण गाळून त्याचे पाणी तयार करा. त्यात मीठ टाकून पाणी तयार करा. चिंच – गुळाचे पाणी थोडे शिजवून त्यात जिरे पावडर आणि मीठ टाका. रगडा तयार करण्यासाठी वाटाणे सोडा घालून शिजवून घ्या. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं लसुण पेस्ट आणि कांदा, टोमॅटो परतून घ्या. त्यात वाटाणे आणि तिखट, मीठ, हळद आणि छोले मसाला टाकून रगडा तयार करून घ्या. वाट्यांमध्ये चिंचगुळाचे पाणी, पुदिना आणि कोथिंबीरीचे पाणी आणि रगडा आणि सात ते आठ पुऱ्या सजवून प्लेट सर्व्ह करा.

--तृप्ती पराडकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.