II होळी II-लेख क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:02:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                           लेख क्रमांक-7
                                          --------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

           कसा साजरा करतात होळी सण How to celebrate Holi :---

     फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो. आज होळी हा सण काही जण ग्रुपमध्ये तर काही जण वैयक्तिक रीत्या साजरा करतात. होळीच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन लाकडे आणि गोवऱ्या घेतात आणि एक ठिकाणी विशिष्ट प्रकारी मांडणी करतात. मग त्या होळीच्या कडेने रांगोळी टाकतात. मुख्यतः संध्याकाळच्या वेळेस होळी दहन ची तयारी केली जाते.

     बायका होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरण पोळीचा स्वयंपाक करून होळीला नैवेद्य दाखवितात. होळीची पूजा, आरती करून होळीची प्रदिक्षणा घातली जाते. लहान मुले होळी भोवती प्रदिक्षणा घालताना " होळी रे होळी, पुरणाची पोळी" असे ओरडतात.

     होळीच्या दुसऱ्या दिवशी " रंगपंचमी " असते. रंगपंचमी मुख्यतः रंगाचा सण आहे. रंगपंचमी खरं तर होळी दहानेच्या राखे पासून खेळतात. पण आजकाल रंगपंचमी हा सण खूप आवडीने खेळला जातो.

     नव- नवीन कृत्रिम आणि रासायनिक रंगांचा उपयोग करून संपूर्ण भारतात रंगपंचमी साजरी होते. पुरातन काळातील लोक रंग म्हणून गुलाल, हळद, कुंकू, चंदनाची पावडर वापरत पण आज रंगीबेरंगी रंग, पाण्याचे फुगे वेगवेगळ्या पिचकाऱ्या वापरून रंगपंचमी सण साजरा केला जात आहे.

               होळी सणाचे महत्व Importance of Holi :---

     भारतीय संस्कृती मध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. होळीच्या सणा मधून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते जी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय होतोच. चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टी वर विजय होतो. आजच्या काळात भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या यांसारख्या गोष्टी वाढत आहेत. पण होळीचा हा सण आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जातो.

     तसेच होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा करतात. नवीन झाडे, झाडाला येणाऱ्या पाकळ्या, झुडपे वसंत ऋतुचे आतुरतेने वाट बघत असतात. होळीचा सण आपल्याला एक चांगली शिकवण देते ती म्हणजे अंधार्‍या समयी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची असते. म्हणजेच जुनी दुःख विसरून येणाऱ्या सुखा साठी प्रयत्न करावे. प्रत्येक दिवसानंतर रात्र येतेच त्या प्रमाणे दुःख नंतर सुख देतेच.

     होळीच्या सणाला सर्व समाजातील लोक जात- पात, धर्म विसरून एकत्र येतात. मनातील राग, द्वेष विसरतात व होळीच्या रंगात रंगतात. सर्व मानव जाती एकत्र येते व होळीचा सण साजरा होतो. होळी सणाचे महत्त्व म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचारांचा नाश करून चांगली वृत्ती बाळगणे, चांगले व सत्याच्या मार्गावर चालायला लावणारे विचार अंगी बाळगणे हा महत्व पूर्ण संदेश होळी सणातून आपल्याला मिळतो.

            भारतातील विविध प्रांतातील होळी सण Holi festivals in different parts of India :---

     होळी हा सण भारता मध्ये विशेषत: उत्तर भारता मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणारा एक रंगाचा सण आहे. होळीच्या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी या उत्सवाला " होलिका दहन " किंवा " होळी पौर्णिमा " म्हणतात. तर काही ठिकाणी " हुताशनी महोत्सव ", " दोलायात्रा ", " कामदहन " अशा नावाने होळी सण साजरा होतो.

     तर कोकणा मध्ये होळीच्या सणाला " शिमगो " म्हणतात. तसेच, देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने होळीच्या सणाला " सुग्रीष्मक " असे नाव दिले आहे.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉरमेशन एसे.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.