II होळी II-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:35:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                              II होळी II
                                          शुभेच्छा क्रमांक-6
                                         -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सुरक्षेचं भान राखू शुद्ध रंग उधळू माखू रसायन,
घाण नको मळी रे आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे आज वर्षाची होळी आली रे
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू...
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे...
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे
म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
--तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या
सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी
एक लाल छटा पाठवला
--होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगांमधल्या
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत
शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी
चला आला आला रंगोत्सव हा आला ...
--तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

तुमची वाणी सदैव राहावी
सुमधुर आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
--तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा


--मराठी स्टाईल
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.